ऐकण्याची कला: या 5 टिप्स तुमची नाती सुधारतील | 5 Key Tips to Improve Your Listening Skills

5/5 - (1 vote)

एकणे हे एक महत्वाचे स्किल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इतरांसोबत तुमचे संवाद वाढवू शकता तसेच नाती सुधारू शकता. या पोस्टमध्ये आपण “The Art of Dealing with People” या Les Giblin यांच्या पुस्तकातील 5 महत्वाच्या आयडियाज जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे ऐकण्याचे स्किल्स (Listening Skills) सुधारू शकता.

1) जो व्यक्ती बोलतोय त्याच्याकडे बघा:
जर एखादी व्यक्ती चांगली माहिती देत आहे, चांगल्या गोष्टी बोलत आहे तर त्याच्याकडे बघणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा तुम्ही स्वतः फोकस राहता आणि त्याने काय बोलले आहे हे समजते.

2) तुम्ही खरंच Interested आहात हे दाखवा:
जेव्हा एखादा व्यक्ती बोलत आहे आणि तुम्ही ऐकत असता तेव्हा त्याची एखादी गोष्ट तुम्हाला पटते तेव्हा मान हलवा. याने बोलणाऱ्याला वाटते की तुम्ही लक्ष देत आहात.

3) बोलणाऱ्या व्यक्तीकडे झुकणे:
तुम्ही कधी नोटीस केले आहे का जेव्हा एखादा Interesting व्यक्ती बोलत असतो तेव्हा आपण आपोआप त्या व्यक्तीकडे थोडेसे झुकतो. पण जेव्हा एखादा छान बोलत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीपासून दूर राहतो. जेव्हा तुम्ही बोलणाऱ्या व्यक्तीकडे झुकता तेव्हा तुम्ही Interested आहात हे स्पष्ट होते.

ही पोस्ट वाचा  👉 सतत यूट्यूब बघता? शिकताय की फक्त वेळ वाया घालवताय?

4) प्रश्न विचारा:
जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात हे सिद्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विचारा. यामुळे तुम्हाला एखाद्या टॉपिकवर जास्त Clarity मिळते.

5) बोलताना टोकू नका:
कोणताही व्यक्ती बोलत असेल तेव्हा मध्येच टोकू नका. त्याचे बोलणे पूर्ण होऊ द्या आणि मग तुमचे विचार मांडा. काही प्रश्न असतील तर त्याचे बोलणे पूर्ण होऊ द्या आणि मग विचारा.

या 5 टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे ऐकण्याचे कौशल्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकता. या टिप्स केवळ तुम्हाला एक चांगला Listener बनवत नाहीत तर तुमच्या परस्परसंवादाची आणि नातेसंबंधांची गुणवत्ता देखील वाढवतात.

जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या Self Improvement कंटेंटबद्दल अपडेट राहायचे असेल तर तुम्ही आम्हाला Threads App वर फॉलो करा. 

Frequently Asked Questions

व्यक्तीकडे बघून ऐकणे का महत्वाचे आहे?

उत्तर: व्यक्तीकडे बघून ऐकणे हे महत्वाचे आहे कारण यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करता आणि त्याच्या बोलण्याचे महत्त्व समजते. डोळ्यात डोळे घालून बोलल्याने तुम्ही ऐकत आहात हे स्पष्ट होते.

कसे दाखवायचे की तुम्ही खरंच Interested आहात?

उत्तर: जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पटते, तेव्हा मान हलवून किंवा होकार दर्शवून दाखवता येते की तुम्ही लक्ष देत आहात. हे बोलणाऱ्याला जाणवते की तुम्ही त्यांच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करत आहात.

बोलणाऱ्या व्यक्तीकडे झुकणे का महत्वाचे आहे?

उत्तर: बोलणाऱ्या व्यक्तीकडे झुकणे हे नैसर्गिकरीत्या दाखवते की तुम्ही त्यांच्या बोलण्यात रुचि घेत आहात. हे शारीरिक संकेत बोलणाऱ्याला तुमच्या लक्षावधानाचे आणि रुचिचे जाणवते.

प्रश्न विचारणे का गरजेचे आहे?

उत्तर: प्रश्न विचारल्याने तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात हे सिद्ध होते. यामुळे तुमची समज वाढते आणि तुम्हाला अधिक माहिती मिळते. प्रश्न विचारल्याने संभाषण अधिक सखोल आणि अर्थपूर्ण होते.

मध्येच टोकू नका, याचे महत्त्व काय आहे?

उत्तर: बोलणाऱ्याला पूर्णपणे बोलू दिल्याने त्यांच्या विचारांची अखंडता राहते आणि त्यांना पूर्ण व्यक्त होण्याची संधी मिळते. मध्येच टोकल्याने संभाषण विस्कळीत होते आणि बोलणाऱ्याला अस्वस्थता येते.

या टिप्समुळे कोणते फायदे मिळतात?

उत्तर: या टिप्समुळे तुम्ही एक चांगला Listener बनता आणि तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होते. तसेच, तुमच्या नातेसंबंधांची गुणवत्ता वाढते आणि तुम्ही इतरांसोबत अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकता.

Leave a Comment