माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज येतात, पण काय करावं सुचत नाही? | The Power of Capturing Ideas for Self-Improvement in Marathi

Rate this post

Self-Improvement Tips: काय तुमच्यासोबत अस कधी झाल आहे? झोपेत असताना तुम्हाला छान स्वप्न पडल होत पण जसे तुम्ही सकाळी जागे होतात ते स्वप्न गायब होत. खूप आठवायचा प्रयत्न करत पण तुम्हाला ते काय आठवतं नाही. 

अगदी असच आपल्या डोक्यातील आयडियाज (Idea) सोबत होत. एखादी चांगली आयडिया तुमच्या डोक्यात येते. पण तुम्ही नंतर विचार करू अस बोलून सोडून देतात. पण एकदा की ती आयडिया गेली की गेली मग पुन्हा येणे नाही. मग कितीही ट्राय करा. मग आता यावर उपाय काय? 

नवीन अपडेटसाठी फॉलो  करा 👉 लिंक 

तुमच्या आयडियाजना  जतन करायला शिका | The Power of Capturing Your Ideas

आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर आपण अनेक विचार करून त्यातून काहीतरी नवीन बनविण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे कधी शक्य होणार जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यातील विचार किंवा आयडियाजना जपायला सुरूवात कराल. ते करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. 

स्टेप १: Record 

जेंव्हा पण डोक्यात एखादी आयडिया येइल किंवा चांगला विचार येईल तो लगेच लिहून ठेवा. त्यासाठी तुम्ही एखादी वही बनवू शकता. पण ही झाली जुनी पद्धत. मी तर यासाठी फोनमध्ये असलेलं Notes App वापरतो. तूम्ही वहीत लिहा की फोनमध्ये आयडिया वाया गेली नाही पाहिजे. 

स्टेप २: Motivation 

एकदा का तुम्ही आयडियजना Capture केलत आणि जपून ठेवलत की नंतर तुम्ही त्यावर काम करू शकता. एखादी आयडिया खूपच चांगली असेल तर त्याला प्राधान्य देऊ शकत. (मी सुध्दा तेच करतो या ब्लॉगच्या पोस्ट लिहिण्यासाठी. एखादी आयडिया चांगली असेल तर त्यावर आधी पोस्ट लिहितो) 

स्टेप ३: Action 

जेव्हा तुम्ही खूप साऱ्या आयडियाज एकत्र कराल आणि त्यांना सतत बघाल तेव्हा कधी ना कधी तुम्हाला अस वाटेल की चला यावर काम करूयात. आयडियाज एकत्र करणे एक चांगल्या मोटिवेशन सारखं काम करत. 

ही पोस्ट वाचा  👉 लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल

आयडियाज तर आहेत, आता पुढें काय करू?

Ideas ना एकत्र करून जपणे ही तर पहिली पायरी झाली. खरी जादू तर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एखाद्या आयडियावर काम कराल, त्यावर काही ॲक्शन घ्याल. पुढील काही मार्गांनी तुम्ही तुमच्या Ideas खऱ्या करू शकता.

ब्लॉग सुरु करा:

 जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये खूपच इंटरेस्ट असेल तर तूम्ही त्यावर एखादा ब्लॉग लिहू शकता. जसं मला Self Improvement या टॉपिकवर वाचायला आवडतं, लिहायला आवडत त्यातूनच मला या ब्लॉगची आयडिया आली होती.

पॉडकास्ट चालू करा:

आजकाल जो तो आपली पॉडकास्ट चालू करत आहे. पॉडकास्ट म्हणजे आपले विचार इतरांसोबत शेअर करणे. मग ते यूट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून असो की Spotify App वर ऑडियोच्या माध्यमातून असो. 

स्वतःचा ब्रँड बनवा:

तुमच्या ज्या काही आयडियाज असतील मग ते ब्लॉग असो, यूट्यूब व्हिडिओ असो मी एखादी बिझनेस आयडिया ज्याचा वापर करून तुम्ही एखाद प्रॉडक्ट बनवणार आहात. हे सगळ करून तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवत असता. 

तुमची आयडिया = तुमची इन्कम 

विचार करा. 

आजकाल यूट्यूबवरून लोकं पैसै कमवितात. कोणी Instragram वरून पैसै कमवत आहे तर कोणी ब्लॉगिंग करत आहे. Shark Tank बघत असाल तर पाहिलं असेल की लोक कशा वेगवेगळ्या Ideas घेऊन बिझनेस सुरु करतात. 

CarryMinati नाव एकल असेल. तो व्यक्ती लोकांना Roast करून पैसे कमवत आहे. (त्याने अस काहीतरी करावं ही सुद्धा एकेकाळी त्याच्या डोक्यातील एक आयडिया असेल) 

मुद्दा असा आहे की कोणतीच आयडिया छोटी नसते. त्यावर काम करून त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. 

Conclusion

मी एक नवा ब्लॉगर आहे त्या हिशोबाने आयडियाज किती महत्वाच्या असतात हे मी तुम्हाला सांगितलं. 

पण याचा अर्थ असा होत नाही की फक्त माझ्यासारख्या व्यक्तीने आयडियाज एकत्र केल्या पाहिजेत. तुम्ही ब्लॉगर, यूट्यूबर, पॉडकास्टर, स्टूडेंट, बिझनेस करणारे असाल. तुम्ही आयडियाज नक्कीच जपलं पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे. 

आयडिया म्हणजे तुमचे विचार, जे आपण सतत स्वतः शी बोलत असतो तो सवांद. कदाचित तुम्हाला तो एवढा महत्वाचा वाटत नसेल पण इतरांसाठी तो एक नवा दृष्टिकोण देण्यास मदत करू शकतो.

म्हणून आजपासून तुमच्या डोक्यात जे काही चांगले विचार येतील, आयडियाज येतील त्यांना जपायला सुरुवात करा. पेन वही घ्या की फोनमधील Notes App. तुम्हाला जे आवडेल ते घ्या आणि आजच सुरुवात करा.