Happy Dussehra Wishes in Marathi: दरवर्षी दसरा हा सण आपल्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, म्हणूनच लोक या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मराठीतून खास संदेश शोधत असाल, तर येथे तुम्हाला अत्यंत आकर्षक आणि हृदयाला भिडणाऱ्या शुभेच्छा संदेशांचा संग्रह मिळणार आहे.
दसऱ्याच्या शुभेच्छा: आनंदाचा आणि विजयाचा दिवस
दसरा म्हणजे विजयादशमी. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली होती. तेव्हा आपण या सणाचा अर्थ लक्षात घेऊन आपल्या जीवनातील नकारात्मकता आणि वाईट विचारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला खास दसरा शुभेच्छा पाठवू शकता.
Happy Dussehra Wish 1
सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून,
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra Wish 2
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra Wish 3
बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी..
उत्सव सोने लुटण्याचा,
करुनी उधळण सोन्याची,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा विशेष: वाईटावर चांगल्याचा विजय
दसरा हा फक्त एक सण नसून, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी आपण मनातील द्वेष, अहंकार आणि वाईट विचारांना जाळून नवा विचार आणि आशा घेऊन जीवनात पुढे जायचं असतं. यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सण साजरा होणार आहे. अशा या मंगलमय दिवशी आपल्या जवळच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा हृदयातील प्रेम व्यक्त करतात.
Happy Dussehra Wish 4
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव,
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन, साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra Wish 5
विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी वाहनी..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा उत्सवाच्या निमित्ताने खास शुभेच्छा
दसरा हा सण आपल्या जीवनात नवीन सकारात्मकता घेऊन येतो. आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याला आणि मित्रांना तुम्ही खालील संदेश पाठवून त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता.
Happy Dussehra Wish 6
आनंदाची तोरणे बांधू दारी,
रांगोळीने सजवू आंगण
विजयोत्सवाचा दिवस आपुला,
करु आनंदाचे सिमोल्लंघन
विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra Wish 7
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण, सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा हा सण नुसता आनंद साजरा करण्याचा नाही तर आत्मचिंतनाचा, सकारात्मकता आणि उन्नतीचा संदेश देणारा आहे. या दसऱ्याला आपल्या जवळच्या लोकांना हृदयातील शुभेच्छा पाठवा आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि प्रगतीची सोनेरी किरणे पसरा. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
ही पोस्ट पण वाचा: TOP 10 RATAN TATA QUOTES: बिझिनेस अणि लाईफचं मार्गदर्शन करणारे रतन टाटा यांचे टॉप १० Quotes (तेही मराठी स्पष्टीकरणासह)