About Author

नमस्कार मित्रांनो!

मी साजन भुवड, एक उत्साही पुस्तकप्रेमी. मला विशेषतः फायनान्स आणि सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तके वाचायला खूप आवडतात. याच वाचनाच्या आवडीमुळे मी कंटेंट क्रिएटर बनलो.

2021 साली मी @marathifinance हे Instagram पेज सुरू केले, ज्यावर आता 18,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर कंटेंट तयार करताना, एक आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणून 2023 मध्ये www.marathifinance.net ही वेबसाइट सुरू केली. मराठी भाषिक लोकांना सोप्या पद्धतीने फायनान्सची माहिती देण्याचं काम इथे मी सुरू केलं.

पण मनात एक खंत होती की एवढी सेल्फ हेल्प पुस्तके वाचूनही मी फक्त फायनान्सशी संबंधित ज्ञानच शेअर करत होतो. बाकी गोष्टी जसे की टाइम मॅनेजमेंट, सेल्फ-इम्प्रूव्हमेंट, बुक इनसाइट्स यांवर मी काहीच सांगत नव्हतो. म्हणून मी www.onepercentmarathi.com या सेल्फ इम्प्रूव्हमेंट ब्लॉगची सुरुवात केली आहे. या ब्लॉगचं ध्येय आहे तुम्हाला दररोज फक्त 1% बेटर बनविण्यात मदत करणे. आणि यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींची माहिती या ब्लॉगवर मिळेल.

  • Self Improvement Tips
  • Motivational Quotes
  • Career Tips
  • Habits
  • इत्यादी

माझं शिक्षण आणि आवडींविषयी सांगायचं झालं तर, मी माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनसाठी मी मुंबईत आलो आणि पाटकर वर्दे कॉलेज, गोरेगाव (पश्चिम) येथे 2021 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

  • तुम्ही मला @sajanbhuvd या इंस्टाग्राम हँडलवर फॉलो करू शकता.
  • तुम्ही मला onepercentmarathi@gmail.com या ईमेलवर देखील संपर्क साधू शकता.

धन्यवाद! 🙏