तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात का? आता काही जण बोलतील की पुस्तके वाचायला तर आवडतात पण पुरेसा वेळ नाही मिळत.
बरोबर ना?
वाचन एक स्किल आहे. याचा वापर करून तुम्ही हवं ते शिकू शकता. पण प्रॉब्लेम असा येतो ना, इंग्लिशमध्ये विविध पुस्तके सहज मिळतात पण मराठीमध्ये हीच पुस्तके सहज उपलब्ध नसतात.
याचा परिणाम काय होतो?
आपण कधी पुस्तके वाचत नाही आणि लाईफमध्ये खूप साऱ्या प्रॅक्टिकल नॉलेजपासून वंचित राहतो.
1% मराठी ब्लॉगची सुरूवात आणि ध्येय
या ब्लॉगच ध्येय खूप स्पष्ट आहे आणि ते म्हणजे “इंग्लिशमधील बेस्ट पुस्तके वाचा आणि त्याची माहिती अगदी सोप्या भाषेत मराठी कम्युनिटीपर्यंत पोचवा.”
आणि फक्तं इंग्लिश पुस्तके नाहीत तर पॉडकास्ट असुदेत की यूट्यूब व्हिडिओज, जे चांगल आहे, जे फायद्याचं आहे, ज्यातून आपण सगळे काहीतरी नवीन शिकू शकतो ते सगळ तुम्हाला या ब्लॉगवर मिळेल.
- Self Improvement Tips
- Success Stories
- Book Insights
- Career Tips
- आणि बरच
कारण आपल्याला दररोज 1% बनायचं आहे.
जर तुम्ही दररोज स्वतामध्ये फक्त 1% सुधारणा केलीत तर एक वर्षात तुम्ही स्वतामध्ये 37.78% एवढी सुधारणा करु शकता आणि जर काहीच सुधारणा नाही केलीत तर वर्षाच्या शेवटी 0.03% याल. जास्त नाही थोड नॉलेज घ्या पण दररोज घ्या.
आणि मला खात्री आहे की या कामात तुमची मदत करेल “1% मराठी” ✌