आजच बदला या 5 वाईट सवयी आणि घडवा यशस्वी आयुष्य | Change 5 Bad Habits and Make a Successful Life in Marathi

Rate this post

Bad Habits: सवयी आपले आयुष्य बनवत असतात आणि बिघडवत असतात. तुम्हाला जर आयुष्यात तुमची जी ध्येय आहेत ती साध्य करायची असतील तर चांगल्या सवयी विकसित करा. पण चांगल्या सवयी विकसित करण्याआधी काही वाईट सवयी आपल्यामध्ये असतात त्यांना आळा घालणे गरजेच आहे. अशा 5 सवयी तुम्ही आजच बदलल्या पाहिजेत त्या पुढीलप्रमाणे:

नवीन अपडेटसाठी फॉलो  करा  लिंक 

1) स्वत:ची तुलना इतरांसोबत करणे आजच थांबवा.

    तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेगळ्या प्रवासात आहात. तुमच्या जीवनाचा पहिला भाग हा इतरांच्या पहिल्या भागापेक्षा नेहमीच वेगळा असेल. जर तुम्ही स्वत:च्या प्रवासाची इतरांसोबत तुलना करता तेव्हा जास्त नुकसान तुमचच होत असत. ते किती पुढे गेले, ते किती चांगल करत आहेत, मीच मागे राहिलो इ. गोष्टी बोलून तुम्ही तुमच आयुष्य कठीण करत आहात. म्हणून तुम्ही जिथे आहात तिथून पुढे कसं जाता येईल याचा विचार करा. कोण तुमच्या पुढे आहे किंवा मागे आहे हे बघणे आजच बंद करा.

    2) पैसे कमवायच्या आधीच गमावू नका.

      हे कसं शक्य आहे? पैसे कमविले नाहीच तर गमावणार कसे? एक साधं उदाहरण घेऊ. ऑफिसमध्ये तुम्हाला बोनस मिळणार आहे याची घोषणा आज बॉसने केली. ऑफिसमध्ये सगळेजण खुश आहेत. लगेच कुठे फिरायला जायचं याचे प्लान बनायला सुरुवात झाली. कोणता नवीन फोन आलाय याच्या यूट्यूबवर व्हिडिओ बघायला लागलात.

      थोडक्यात काय तर, अजून पैसे आले नाहीत पण ते कसे आणि कुठे खर्च होणार याची तयारी झाली. यालाच म्हणतात कमविण्याआधी गमावणे. ही सवय बदलली पाहिजे नाहीतर कधीच तुम्ही पुरेशी सेविंग करू शकणार नाही.

      3) नवीन गोष्ट किंवा आयडिया ट्राय करायची भयंकर भीती.

        जो पर्यंत तुम्ही एखादी गोष्ट ट्राय करणार नाही तो पर्यंत तुम्हाला कसं कळेल की ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. समजा तुम्हाला फोटोग्राफी शिकायची आहे तर यासाठी हातात फोन घेऊन किंवा कॅमेरा घेऊन बाहेर पडावं लागेल. विविध प्रकारचे फोटो काढावे लागतील. तेव्हा कुठे तुम्हाला समजेल की फोटोग्राफी तुमच्यासाठी आहे की नाही ते. ट्राय करा, त्यातून शिका, जमलं तर ठीक नाहीतर दुसरी गोष्ट तुमची वाट बघत असेल एवढं नक्की.

        ही पोस्ट वाचा   स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी हे काम करा

        4) कुठेही जा तुम्ही नेहमी उशिरा येता.

          कॉलेजचे सगळे फिरायला चालले आहात. मित्र स्टेशनवर येऊन तुमची वाट बघत आहेत पण तुमचा काही पत्ता नाही. 5 मिनिटात येतो सांगून आता अर्धा तास झाला. आता ही सवय कॉलेजमध्ये असताना चालून जाते. मित्र आहेत ते वाट बघतात. समजून घेतात.

          पण जेव्हा तुम्ही एका ऑफिसमध्ये जॉबसाठी जाता तेव्हा हीच सवय तुमच्या ग्रोथमधील अडथळा बनते. तिथे तुम्हाला सतत कोणी समजून घेणार नाही. आणि बॉस तर एक संधी बघत असतो तुम्हाला बोलायची. म्हणून कधीही वेळेवर आलेल बरं. सगळ्यात बेस्ट म्हणजे वेळेच्या आधी येणे. ना कसली घाई, ना कसलं टेंशन.

          5) वेळेवर न झोपणे.

            तुम्ही लास्ट टाइम कधी वेळेवर झोपला होतात? आठवत आहे का तुम्हाला? नाही ना. आजकाल रात्री झोपताना पहिला फोन हातात लागतो त्याशिवाय झोप येतच नाही. एक रील पहिली मग दुसरी मग तिसरी. असं करत करत कधी 2 तास होतात कळत नाही. आणि मग झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं. त्यात पण शरीरात चांगली ऊर्जा नसते म्हणून पूर्ण दिवस खराब जातो. आणि हे चक्र असंच चालू राहतं.

            पुरेशी झोप न घेतल्याने खूप सारे आरोग्यविषयक समस्या तुम्हाला बघायला मिळतील. (आता लगेच नाही कारण तुम्ही आता तरुण आहात. पण जसजस वय होतं तसतसे हे आजार दिसायला सुरुवात होते.)

            • स्ट्रोक
            • डायबिटीज
            • हृदयविकाराचा धोका
            • उच्च रक्तदाब
            • इत्यादी आजारांची रिस्क असते.

            निष्कर्ष:

            चांगल्या सवयी आपले जीवन घडवतात, तर वाईट सवयी त्याचे नुकसान करतात. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर चांगल्या सवयींना आपल्यामध्ये रुजवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाईट सवयींना आळा घालून सकारात्मक सवयी स्वीकारल्याने तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढेल. त्यामुळे आजपासूनच या सवयींमध्ये बदल करून तुमच्या ध्येयांच्या दिशेने पाऊल टाका.

            ही पोस्ट वाचा   लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल

            Leave a Comment