“How to Win Friends and Influence People” हे पुस्तक कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्यासाठी लिहिलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे. Dale Carnegie यांच्या या क्लासिक पुस्तकात, त्यांनी दिलेली साधी आणि प्रभावी तत्त्वे आजही कामाची आहेत. यातलं एक प्रमुख तत्त्व म्हणजे, जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तेव्हा ती प्रामाणिकपणे मान्य करा.
नवीन अपडेटसाठी फॉलो करा लिंक
तुम्ही तुमची चूक का मान्य केली पाहिजे?
यामध्ये फायदा हा तुमचाच असेल. ते कसं काय हे जाणून घेण्यासाठी ही पुढील छोटी गोष्ट वाचा.
लेखक Dale Carnegie त्यांच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी त्यांच्या घराच्या जवळच्या एका पार्कमध्ये जात असत. आता पार्क म्हंटल की तिथे इतर लोक, लहान मुले तसेच इतर छोटे मोठे प्राणी असत जसे की खार इत्यादी. आता त्या पार्कमध्ये कुत्रा फिरवताना कुत्र्याच्या तोंडाला कव्हर लावणे हा तिथला नियम होता. पण Dale Carnegie यांच्या कुत्र्याला त्याच्या तोंडाला कव्हर लावलेलं अजिबात आवडत नसे.
एके दिवशी असच पार्कमध्ये कुत्रा फिरवताना तिथल्या एका पोलिसाने Dale Carnegie यांना पाहिलं आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला कळत कसं नाही? याला असच फिरवत आहात? तो कोणाला चावला तर?” त्यावर Dale Carnegie म्हणाले, “मला नाही वाटत तो कोणाला चावेल.”
हे ऐकून तो ऑफिसर अजूनच चिडला आणि म्हणाला, “तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये, नियम जो आहे तो आहे. यावेळी मी तुम्हाला सोडत आहे पण पुढच्या वेळी काळजी घ्या.” Dale Carnegie शांतपणे म्हणाले की, “अशी चूक पुन्हा नाही होणार,” आणि तो ऑफिसर तिथून निघून गेला.
पुढचे काही दिवस Dale Carnegie त्यांच्या कुत्र्याच्या तोंडाला कव्हर लावून फिरवत असत. पण हे फक्त काही दिवस चाललं कारण त्यांचा कुत्रा तोंडाला कव्हर लावलं की खूप दंगा करत असे. एके दिवशी हिम्मत करून Dale Carnegie यांनी त्यांच्या कुत्र्याच्या तोंडावरील कव्हर काढून त्याला पार्कमध्ये फिरवत होते आणि जे नको व्हायला पाहिजे होतं, नेमकं तेच झालं. त्या ऑफिसरने Dale Carnegie यांना पाहिलं.
तो रागारागाने त्यांच्या दिशेने येऊ लागला, पण तो त्यांना काही सुनवणार त्या आधीच Dale Carnegie म्हणाले की, “ऑफिसर, माझी चूक झाली. तुम्ही मला सांगितलं होतं की कुत्र्याला फिरवताना तोंडाला कव्हर लावा. मी हा नियम तोडला आहे. मला माफ करा.” हे ऐकून तो ऑफिसर जरा शांत झाला. तो Dale Carnegie यांना म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही याला फिरवा इथे, पण लक्ष ठेवा.”
Dale Carnegie म्हणाले, “तो कोणाला चावू शकतो, ऑफिसर.” त्यावर तो ऑफिसर म्हणाला, “तुम्ही उगाचच नको ते विचार करताय. लक्ष ठेवा, काही नाही होणार,” आणि तो ऑफिसर निघून गेला.
ही पोस्ट वाचा तुम्ही जो विचार कराल ते साध्य कराल, कस ते जाणून घ्या
आता इथे नक्की काय झालं? या गोष्टीचा तात्पर्य काय आहे?
Dale Carnegie सांगतात की चुका तर होतात पण ते मान्य करण्यात आपली भलाई असते. जर तुम्हाला माहित आहे की तुम्ही चूक केली आहे आणि त्याची जाणीव पण तुम्हाला आहे तर मान्य करण्यात शहाणपण आहे. कारण? तुमच्या चुकीसाठी कोणी दुसरा व्यक्ती तुम्हाला नको नको ते बोलेल तर तुम्हाला कसं वाटेल?
म्हणून कोणी दुसरा व्यक्ती तुम्हाला काही बोलण्याआधी तुम्ही चूक मान्य केलेली चांगली असते. असं केल्याने त्या समोरच्या व्यक्तीचा राग खूप कमी होतो. असं करून तुम्ही जरी चूक केली असेल तरीही शेवटी तुम्ही जिंकणार आहात असं लेखक Dale Carnegie सांगतात. पुढच्या वेळी जर एखादी चूक केलीत तर मोठ्या मनाने ती मान्य करा आणि बघा काय होतं. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.
निष्कर्ष
Dale Carnegie यांचे हे पुस्तक आपल्याला शिकवते की चुका मान्य करणे ही एक महत्त्वाची कला आहे, जी केवळ आपल्या संबंधांना सुधारतेच नाही तर आपल्याला एक उत्तम व्यक्ती बनवते. चुकीला मान्य करण्याच्या साध्या टीपने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील राग कमी करू शकता आणि एक विश्वासार्ह व आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकता.
त्यामुळे पुढच्या वेळेस, एखादी चूक झाली तर ती मोठ्या मनाने मान्य करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे संबंध सुधारतील आणि तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्व विकसित कराल.
ही पोस्ट वाचा माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज येतात, पण काय करावं सुचत नाही?
1 thought on “चूक झाली मान्य करा, कारण यात फायदा तुमचा आहे | How to Win Friends and Influence People Book in Marathi”