2019 मध्ये कॉलेजमध्ये असताना, मी “Think and Grow Rich” हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं. त्या काळात माझ्या आयुष्यात बरेच बदल होत होते, आणि या पुस्तकातील धड्यांनी मला खूप प्रेरणा दिली. आज, जवळपास 4 वर्षांनंतर, मी हे पुस्तक पुन्हा वाचायला घेतलं आहे. या पुस्तकातील विचार आणि तत्त्वज्ञानांनी मला आतापर्यंतची वाटचाल समजून घेण्यात मदत केली आहे. आता या पुस्तकातील 5 महत्वाचे धडे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जे माझ्या अनुभवातून मला खूप उपयोगी पडले आहेत.
नवीन अपडेटसाठी फॉलो करा लिंक
1. तुमचे विचार = तुमची रीयालिटी
आपले विचार हे दिसत नाहीत, पण त्यांच्यात एवढी पॉवर आहे की ते आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात. तुम्ही कोणतीही मोठी अचिव्हमेंट घ्या, तिची सुरुवात एका साध्या विचाराने होते.
- एक्झाममध्ये चांगले मार्क हवेत हा एक विचार होता, पण तुम्ही त्यावर काम केलं आणि त्याचे परिणाम तुम्हाला मिळाले.
- चांगली नोकरी मिळवणे हा एक विचार असतो, पण त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आणि तुम्हाला नोकरी मिळाली.
- चांगली हेल्थ हवीय, बॉडी हवीय हा एक विचार असतो, त्यासाठी तुम्ही मेहनत घेतलीत, जिममध्ये घाम गाळलात. याचा परिणाम आज तुम्ही फिट आहात.
तुम्ही कोणतंही काम घ्यायच्या आधी तो एक विचार असतो. म्हणून चांगले विचार करा. त्यासाठी मेहनत घ्या. यश तुमचं आहे एवढं नक्की.
2. आधी आत्मविश्वास मग यश
जर तुमच्यात आत्मविश्वासाची कमी असेल, तर एखादी आयडिया डोक्यात असूनही, त्या कामावर Action घेऊ शकत नाही. तुमच्या आतल्या आत्मविश्वासाला ओळखा. हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती स्वतःवर शंका घेतो, “माझ्याने हे काम होईल का?” “मी फेल तर होणार नाही?” असे अनेक विचार येतात. पण लक्षात ठेवा, यश त्यांनाच मिळतं जे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या शंका दूर करतात.
3. जशी एनर्जी तुमच्यात आहे तशी एनर्जी तुम्ही आकर्षित करता
जर तुमचे विचार वाईट असतील, तर तुम्ही वाईट विचारांच्या माणसांना आकर्षित करता. आणि जर तुमच्यात सकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही तशाच माणसांना आकर्षित कराल. तुमची एनर्जी, तुमचे विचार हे नेहमी चांगले ठेवा. जीवनात चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. जगाला सकारात्मक एनर्जी द्या, समोरून तुम्हाला सकारात्मक एनर्जी मिळेल.
ही पोस्ट वाचा लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल
4. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता
तुमचा विश्वास हा तुमच्या यशाचा पाया आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमचं जे ध्येय आहे, त्याचा विचार तुम्ही तुमच्या माइंडमध्ये केला पाहिजे. ते ध्येय पूर्ण केल्याची कल्पना तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या माइंडमध्ये करा. आणि हा विश्वास तोपर्यंत ठेवा जोपर्यंत तुम्ही ते ध्येय अचिव्ह करत नाही.
5. तुमच्यात काही करण्याची ज्वलंत इच्छा असायला हवी
एखाद्या गोष्टीचं पॅशन तुमच्यात असायला हवं. हे पॅशन खूप जबरदस्त असलं पाहिजे. अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही जर मनात तुमचं ध्येय प्राप्त करण्याची ज्वलंत इच्छा असेल, तरच तुम्ही:
- त्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्याल.
- तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम कराल.
- काही गोष्टी सोडाव्या लागल्या तरी त्यासाठी तयार असाल (झोप, ट्रॅव्हल, सोशल मीडिया इ.)
निष्कर्ष
“Think and Grow Rich” हे पुस्तक आपल्याला शिकवते की, आपल्या विचारांची शक्ती किती महान आहे. योग्य विचार, आत्मविश्वास, सकारात्मक एनर्जी, दृढ विश्वास, आणि ज्वलंत इच्छा यांचा संगम झाला तर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो. हे धडे आपल्या जीवनात लागू करून आपण आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो.
ही पोस्ट वाचा माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज येतात, पण काय करावं सुचत नाही?
1 thought on “तुम्ही जो विचार कराल ते साध्य कराल, कस ते जाणून घ्या | Insights from ‘Think and Grow Rich’ Book in Marathi”