Self-Improvement Tips: परिपूर्णता कमी दर्जाची आहे अस समजल जात. परिपूर्णता म्हणजे नेहमी कोणत्याही कामात परफेक्ट बनणे. आता परफेक्ट बनणे वाईट नाही. पण परफेक्ट बनायच्या नादात अनेकजण कधी एखादं काम पूर करतच नाहीत.
पण परफेक्ट बनणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एखादया ठराविक कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्या कामात नेहमी अधिक, अधिक, अधिक मेहनत घ्यावी लागेल. अस करूनच तुम्ही त्यात कामात परफेक्ट बनता.
आजकालची दुनिया वेगवान झाली आहे. जिथे लोक दिवसाला 100+ विचारांनी भरलेले असतात, सतत डोक्यात काही ना काही चाललेल असत. अशा परिस्थितीत तुम्ही एखाद काम कराल ते लोकांच्या लक्षात कस राहणार? तुम्ही कितीही काम केलं तरी लोकं अनेकदा नोटीससुद्धा करत नाहीत. (खास करून अस जॉबवर होत)
पण परफेक्ट बनणे का गरजेच आहे याच एक उदाहरण म्हणजे ॲलेक्स होर्मोझी. ॲलेक्स होर्मोझी यांची पुस्तके जाहिरातींवर कसलाही खर्च न करता महिन्याला लाखोमध्ये विकली जातात.
होर्मोझी यांच पुस्तक $100M Offers हे मार्केटिंगवर सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे. हे अनेक दशके विकले जाणार आहे आणि लोक त्याबद्दल 24/7 बोलतात.
त्यांनी हे कसे साध्य केले?
ॲलेक्स होर्मोझी हे पुस्तक 26+ वेळा पुन्हा लिहिले, जोपर्यंत ते वाचणाऱ्यांसाठी परफेक्ट होत नाही. आता याला तुम्ही परफेक्ट होणे नाही म्हणणार तर अजून कशाला ते मला माहित नाही. मुद्दा असा आहे ना इतके चांगले व्हा किँवा एखादं काम एवढं चांगल जरा की लोकं तुमच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नाहीत.
ही पोस्ट वाचा : या 5 गोष्टी कोणासोबत शेअर करू नका
आता तुम्ही एवढं परफेक्ट कस बनू शकता?
प्रयत्न करण्यासाठी लागणारा खर्च आजकाल फ्री आहे. खर्च पण फ्री पण? कस शक्य आहे? एखादं काम सुरु करायचं म्हणजे खर्च आलाच. पण या सोशल मीडियाच्या जगात सुरुवात करणे पूर्णपणे फ्री आहे. एक उदाहरण देतो.
90% पॉडकास्ट भाग 3 च्या नंतर एकही भाग बनवत नाहीत. जे करतात त्यापैकी, 90% भाग 20 पर्यंत बनवतात नंतर सोडतात. पॉडकास्टच्या टॉप 1% मध्ये येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 21 भाग पर्यंत टिकून रहा.
आता मी तुम्हाला पॉडकास्ट चालू करा अस सांगत नाही. पण कोणतही कामं घ्या किंवा स्किल. मग ते पॉडकास्ट असो की यूट्यूब किंवा ब्लॉगिंग. कोणीच जास्त वेळ टिकून राहत नाही. जग दुबळे आहे. पण तुम्ही खंबीर बना. प्रत्यक्ष प्रयत्न करा. जर टिकून राहिलात तर तुम्ही त्या कामात टॉप १% मध्ये नक्की येणार.
परफेक्ट बनायची सोप पद्धत काय आहे?
कोणत्याही कामात मी कसा बेस्ट राहीन याचा तुम्ही पाठलाग केलात तर यश तुमचं असत. जर तुम्हाला लाईफमध्ये चांगले रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला त्या रिझल्टकडे दुर्लक्ष करावे लागेल. (कन्फ्युज?)
चांगले रिझल्ट हवय तर त्यावर दुर्लक्ष करून कस चालेल? रिझल्टवर प्रतेक वेळी फोकस करण्यापेक्षा तुम्ही कामाच्या प्रोसेसवर फोकस करा. कारण तुम्ही प्रोसेस दररोज केलीत तर रिझल्ट तर मिळणारच आहेत. म्हणून पहिलं काम एके काम. मग त्याचा परिणाम. म्हणून मेहनत घेत रहा. तेही दररोज!
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या Self Improvement कंटेंटबद्दल अपडेट राहायचे असेल तर तुम्ही आम्हाला Threads App वर फॉलो करा.