Self-Improvement Tips in Marathi: आजकाल जमाना सोशल मीडियाचा आहे. मी सकाळी ऑफिसला जाताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आजकाल प्रत्येक जण मेट्रोमध्ये, ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये काही ना काही कंटेंट बघत असतो, मग ते यूट्यूब व्हिडिओ असोत किंवा इंस्टाग्राम रील्स. पण सतत एवढं सगळं कंटेंट बघून आपण खरंच काही नवीन शिकतोय का? की फक्त आपल्याला असं वाटतंय की आपण शिकतोय? हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत.
नवीन अपडेटसाठी फॉलो करा लिंक
Critical Thinking कमी होत आहे
जेव्हा तुम्ही सतत यूट्यूबवर एकामागोमाग एक व्हिडिओ बघता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात. पण काय आपण खरंच शिकतोय? की फक्त व्हिडिओ लावून ऐकत असतो? त्या क्षणाला आपल्याला वाटतं की सगळं समजलं आहे. पण काही वेळानंतर, काही दिवसांनंतर आपल्याला काहीच आठवत नाही.
सोबतच आजकाल प्रत्येक गोष्ट किंवा कॉन्सेप्ट एखादा यूट्यूबर समजावून देतो तेव्हा आपल्या ते डोक्यात जातं. मग ते फायनान्सवरील टॉपिक असो की फिटनेस. आपण स्वतःचा मेंदू वापरून काही शिकण्याचा प्रयत्न करणे बंद केलं आहे. याचा परिणाम असा की आपण क्रिटिकल थिंकिंगसारख्या गोष्टी विसरत चाललो आहोत. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे एखादी गोष्ट योग्य आहे का नाही याचा योग्य अंदाज लावणे. आणि मग योग्य तो निर्णय घेणे.
Personal Growth नक्की होतेय का?
तुम्ही स्वतः विचार करा की गेले काही वर्ष तुम्ही यूट्यूबवर एवढा वेळ देत आहात. हव्या त्या व्हिडिओ बघत आहात, पण लाईफमध्ये किती बदल झाला आहे? फायनान्स शिकण्यासाठी व्हिडिओ बघता, फिटनेसच्या व्हिडिओज बघता, बुक्सच्या समरी बघता किंवा इतर काही स्किल्स शिकता. पण नुसते व्हिडिओ बघून काय होणार? तुम्हाला कधी ना कधी स्वतःला ॲक्शन घ्यावीच लागेल. त्यामुळे यूट्यूब व्हिडिओ बघून आपल्याला वाटतं की आपली पर्सनल ग्रोथ होत आहे. पण खरं सांगायचं तर काहीच होत नाही. फक्त वेळ वाया जातो.
नॉलेजचा वापर करताय की नाही?
तुम्ही स्वतःला विचारा. आतापर्यंत तुम्ही किती यूट्यूब व्हिडिओज पाहिल्या असतील? फायनान्स असो की फिटनेस, पण त्या नॉलेजचा वापर तुम्ही कधी केलात का? तुम्ही पैसे नीट मॅनेज करत आहात का? तुम्ही जिम किंवा घरीच व्यायाम करत आहात का? नाही ना? हेच आपल्यासोबत होतंय. यूट्यूबवर एवढं कंटेंट आहे की आपण फक्त बघत राहतो. त्या नॉलेजची अंमलबजावणी होतच नाहीये.
ही पोस्ट वाचा लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल
आता या सगळ्यावर उपाय काय?
फक्त Passive Observer बनून राहू नका तर स्वतः सहभाग घ्या. Passive Observer म्हणजे असा व्यक्ती जो फक्त गोष्टी शिकतो. शिकलेल्या गोष्टींचा काही वापर करत नाही. पण तुम्हाला अस करायच नाहीये. याउलट तुम्हाला पुढील गोष्टींवर पूर्ण फोकस करावा लागणार आहे:
1) जीवनातील महत्वाची कामे ठरवा
फिट राहण्यासाठी व्यायाम करणे, नॉलेज वाढविण्यासाठी पुस्तके वाचणे किंवा नवनवीन स्किल शिकणे अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवा. यूट्यूब असो की इतर सोशल मीडिया ॲप्स, वापर करा पण प्रमाणात.
2) एखादं काम निवडा जे तुम्हाला चॅलेंज करेल
मी माझ्या जॉब व्यतिरिक्त घरी आल्यावर काही वेळ हा ब्लॉग लिहिण्यासाठी देतो. का ते माहीत नाही पण याने माझा कामाचा ताण कमी होतो. सोबतच याने माझं नॉलेज पण वाढतं आहे. आणि मी तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो. मला आशा आहे लवकरच आपली एक मोठी, दररोज 1% बेटर बनणारी कम्यूनिटी बनेल. अगदी असच तुम्हाला सुध्दा एखादा काम किंवा छंद बघायचा आहे जो तुम्हाला ऍक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह ठेवेल.
3) नॉलेज फक्त घेऊन नाही, त्याचा वापर करणे गरजेच आहे
आजपासून हवं तर एखादा व्हिडिओ कमी बघा. पण जे यूट्यूब व्हिडिओ बघाल, त्यातून तुम्ही काय शिकलात याचा विचार करा. त्या नॉलेजचा वापर तुम्ही तुमची लाइफ बेटर बनविण्यासाठी कसा करू शकता हे बघा.
4) एक Action Plan तयार करा
तुम्ही काय शिकायचं आहे आणि ते कसं अमलात आणायचं आहे याचा एक स्पष्ट प्लॅन तयार करा. रोज थोडा वेळ त्यात गुंतवा. उदाहरणार्थ, फिटनेसच्या व्हिडिओ बघून त्यातील एक्सरसाइज तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा.
5) योग्य कंटेंट निवडा
सतत कंटेंट कन्झ्यूम न करता, गुणवत्तापूर्ण कंटेंट बघा. म्हणजेच जे तुम्हाला खरंच फायदेशीर ठरेल असं कंटेंट निवडा. त्यामुळे तुम्ही वेळ वाया न घालवता योग्य नॉलेज मिळवू शकाल.
निष्कर्ष | Conclusion
सतत सोशल मीडियावर कंटेंट कन्झ्यूम करणं आजच्या युगात सहज शक्य आहे, पण त्यातून काहीतरी वास्तविक शिकणे किंवा प्रगती साधणे खूप महत्त्वाचं आहे. फक्त व्हिडिओ पाहून आणि माहिती गोळा करून काहीही साध्य होत नाही. त्या माहितीचा प्रत्यक्ष वापर करून, आपले विचार आणि कृतीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
त्यामुळे आजचं आपलं एक्शन प्लान तयार करा, योग्य कंटेंट निवडा, या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या Self Improvement Tips चा तुमच्या आयुष्यात वास्तवात बदल घडवून आणा. यशस्वी होण्यासाठी तुमच्यामध्ये पुरेशी क्षमता आहे, फक्त ती योग्य रीतीने वापरावी लागेल. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, “समस्या अशी आहे की तुम्हाला वाटते की तुमच्याकडे वेळ आहे.” आजच आपल्या ध्येयांसाठी कामाला लागा, कारण वेळ कमी आहे.
ही पोस्ट वाचा माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज येतात, पण काय करावं सुचत नाही?
Frequently Asked Questions
1. सोशल मीडियावर कंटेंट बघणं खरंच फायदेशीर आहे का?
सोशल मीडियावर कंटेंट बघणं फायदेशीर असू शकतं, पण त्यातून तुम्ही काय शिकता आणि त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करता हे महत्त्वाचं आहे. सतत व्हिडिओ पाहून नुसतं मनोरंजन किंवा माहिती मिळवणं पुरेसं नाही, त्यातून काहीतरी वास्तवात अमलात आणणं गरजेचं आहे.
2. सतत यूट्यूब बघून आपण खरंच काही नवीन शिकतो का?
सतत यूट्यूब बघून शिकण्याची प्रक्रिया तात्पुरती असू शकते. काही दिवसांनंतर आपण पाहिलेलं विसरतो. त्यामुळे शिकलेल्या गोष्टींचा वापर प्रत्यक्षात करून त्यांचं जीवनात अमलात आणणं महत्त्वाचं आहे.
3. सोशल मीडिया कंटेंट बघण्यामुळे क्रिटिकल थिंकिंग कमी होतं का?
होय, सतत सोशल मीडिया कंटेंट बघणं आणि त्यावर अवलंबून राहिल्यामुळे क्रिटिकल थिंकिंग कमी होऊ शकतं. आपण स्वतःच्या विचारशक्तीचा वापर करून शिकणं आणि योग्य निर्णय घेणं कमी करत आहोत.
4. सतत यूट्यूब बघून Personal Growth नक्की होतेय का?
फक्त कंटेंट बघून पर्सनल ग्रोथ होत नाही. त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करणं गरजेचं आहे. एक्शन घेऊन ते ज्ञान जीवनात लागू केलं पाहिजे.
5. नॉलेजचा वापर कसा करायचा?
काय शिकायचं आहे आणि ते कसं अमलात आणायचं आहे याचा एक स्पष्ट प्लॅन तयार करा. नियमितपणे त्या ज्ञानाचा वापर करून जीवनात सुधारणा करा. उदाहरणार्थ, फिटनेस व्हिडिओ बघून त्यातील एक्सरसाइज प्रत्यक्षात करा.
6. Passive Observer बनून राहू नका म्हणजे काय?
Passive Observer म्हणजे फक्त गोष्टी शिकणं पण त्याचा काहीही प्रत्यक्षात वापर न करणं. त्यामुळे फक्त ज्ञान गोळा न करता, त्याचा वापर करून स्वतःला सुधारण्यासाठी कृती करावी.
7. ऑनलाइन योग्य कंटेंट कसा निवडायचा?
गुणवत्तापूर्ण कंटेंट निवडा. फक्त मनोरंजनासाठी नाही तर जे तुम्हाला वास्तवात फायदेशीर ठरेल असं कंटेंट निवडा. त्यामुळे तुम्ही वेळ वाया न घालवता योग्य ज्ञान मिळवू शकता.
8. Action Plan तयार करण्याचे महत्त्व काय?
Action Plan तुम्हाला शिकण्याच्या प्रक्रियेत दिशा देतो. काय शिकायचं आहे आणि ते कसं अमलात आणायचं आहे याचं स्पष्ट मार्गदर्शन मिळतं. रोज थोडा वेळ त्यात गुंतवल्यामुळे तुम्ही योग्यप्रकारे प्रगती करू शकता.
9. सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा?
सोशल मीडियाचा योग्य वापर म्हणजे त्यातून मिळालेलं ज्ञान प्रत्यक्षात वापरणं. फक्त कंटेंट बघून न थांबता, त्या ज्ञानाचा वापर करून तुमची व्यक्तिगत प्रगती साधणं गरजेचं आहे.
6 thoughts on “सतत यूट्यूब बघता? शिकताय की फक्त वेळ वाया घालवताय? | Self-Improvement Tips in Marathi”