कोणत्याही कामात पूर्णपणे फोकस कस रहायच? | Stay Focused with 3 Tips from Indistractable Book in Marathi

Rate this post

Stay Focused: आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात, विचलनांपासून दूर राहणे आणि फोकस राखणे हे आव्हानात्मक झाले आहे. आपण सगळेच वेळोवेळी आपला सारा वेळ स्मार्टफोन आणि सोशल मीडिया ॲप्सवर घालवतो. हे विचलनं आपल्याला आपल्या महत्वाच्या कामांपासून दूर नेतात. म्हणूनच, आपण “Indistractable” या Nir Eyal लिखित पुस्तकातील काही महत्वाचे धडे समजून घेणार आहोत. या पुस्तकात दिलेल्या प्रॅक्टिकल टिप्स आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतात आणि आपल्याला विचलनांपासून वाचवू शकतात.

जर तुम्हाला सतत फोनच्या आणि सोशल मीडिया ॲप्सच्या आहारी जाण्याची सवय असेल आणि तुम्हाला फोकस राहण्याची गरज वाटत असेल, तर हे पुस्तक आणि त्यातील धडे तुम्हाला नक्कीच मदत करतील. चला तर मग, “Indistractable” मधील 3 महत्वाचे धडे पाहूया जे आपल्या जीवनाला अधिक प्रोडक्टिव्ह बनवतील आणि विचलनांपासून मुक्त करतील.

नवीन अपडेटसाठी फॉलो  करा : लिंक 

1) फोनला तुमच्यापासून दूर ठेवा (खूप खूप दूर)

जेव्हा पण तुम्ही एखादं काम करायला किंवा स्टडी करायला बसता, तेव्हा तुमचा फोन तुमच्यापासून खूप दूर, किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवा. आणि हो, बेस्ट म्हणजे सायलेंटवर ठेवा. पण का?

काही स्टडीजमध्ये हे सिद्ध झाले आहे की जेव्हा फोन तुमच्या नजरेसमोर असतो, तेव्हा त्याला सतत चेक करावं असं वाटत राहतं. कोणता मेसेज येऊदे की नको येऊदे, सतत फोन चेक करावासा वाटतो. आणि जर तुम्ही फोन तुमच्या नजरेआड ठेवलात, अगदी स्वतःपासून दूर, तर तुमचा मेंदू जे काम तुम्ही हातात घेतले आहे, त्याकडे पूर्ण फोकस होतो.

जर खूपच गरजेचं असेल तर फोन जवळ ठेवा, पण त्याची रिंग रिंग, टिंग टिंग बंद ठेवा. आणि फोन समोर जरी ठेवला तरी उलटा ठेवा, जेणेकरून एखादा मेसेज आला तरी तुमचं कामाकडे दुर्लक्ष होणार नाही.

2) 10-Minute Rule चा वापर करून Distractions ला हरवा

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही महत्त्वाचं काम करायला घ्याल आणि तुम्हाला काही वेळाने फोन वापरावासा वाटेल, तेव्हा जरा वेळ थांबा. तुम्हाला फोन का वापरायचं आहे यावर विचार करा. तुम्ही जे वाटतं ते लिहून काढू शकता. याने फायदा असा होतो की तुम्ही सतत हे काम म्हणजेच फोन चेक करणे का करत आहात याचं खरं कारण तुम्हाला समजतं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही १० मिनिटं थांबता, तेव्हा फोन चेक करायची सवय तुम्ही मोडत असता.

उदाहरणार्थ, आता मी ही ब्लॉग पोस्ट लिहित आहे आणि मला आता जरा वेळ यूट्यूब बघावसं वाटतं आहे (कारण तेच आहे की जरा बरं वाटेल, मूड ठीक होईल). पण मी जरा विचार केला की हे करणं गरजेचं आहे का? जर मला ब्लॉग लिहायला सुचत नसेल तर मी बुक वाचू शकतो किंवा बाहेर चालायला जाऊ शकतो. (फोन चेक करायची ऐवजी तुम्ही दुसरं कोणतं चांगलं काम करू शकता याचा विचार करा).

जर तुम्ही हा नियम फॉलो केला आणि फोन चेक करण्याआधी १० मिनिटं वाट पाहिलीत, तर तुम्हाला काही दिवसांनी जाणवेल की सतत फोन चेक करायची सवय कमी होत आहे. १० मिनिटं थांबल्याने फोन चेक करायची इच्छा कमी होत आहे. आणि एकदा का फोन चेक करायची इच्छा गेली की तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे फोकस होऊ शकता.

ही पोस्ट वाचा : तुम्ही जो विचार कराल ते साध्य कराल, कस ते जाणून घ्या

3) 4 R चा वापर करून तुमच्या फोनवर कंट्रोल मिळवा

जेव्हा एखादी चांगली गोष्ट येते, तेवढेच तिचे नुकसान पण असतात. आजकालचे स्मार्टफोन त्यापैकी एक आहेत. स्मार्टफोन घेतला की मग त्यासोबत त्याचा व्यसन पण आलच.पण तुमच्या फोनने तुम्हाला कंट्रोल करण्याआधी तुम्ही त्याला कसं कंट्रोल करू शकता हे बघा. आणि यासाठी तुम्ही 4R या टेक्निकचा वापर करू शकता. कसं ते पुढीलप्रमाणे:

  • Remove: जे ॲप्स तुम्ही वापरत नाही किंवा खूपच विचलित करतात, त्यांना Uninstall करा.
  • Replace: तुम्ही सोशल मीडिया ॲप्स सहसा मोबाईलवर वापरत असाल. शक्य झालं तर त्यांना लॅपटॉप किंवा PC वर वापरा. याने काय होतं की तुम्ही सतत लॅपटॉपसोबत घेऊन जाऊ शकत नाही. नो लॅपटॉप, नो सोशल मीडिया.
  • Rearrange: जे ॲप्स मोबाईल स्क्रीनवर बघून सतत वापरावं वाटतात, त्यांना होम स्क्रीनवरून हटवा किंवा Gray Mode चा वापर करा. याने काय होतं की पूर्ण फोन अगदी Gray होऊन जातो. सतत फोन वापरावं असं वाटत नाही.
  • Reclaim: नोटिफिकेशन सेटिंग बदला. जे ॲप्स सतत वाजत राहतात, त्यांचे नोटिफिकेशन बंद करा. खास करून WhatsApp, YouTube, Instagram इ. (Do Not Disturb वर फोन ठेवून मग एखादं काम करायला घ्या).

निष्कर्ष:

“Indistractable” या पुस्तकातील या 3 महत्वाच्या धड्यांनी आपल्याला विचलनांपासून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या कामावर पूर्ण फोकस राहण्यासाठी मदत होते. या टिप्स फॉलो करून, तुम्ही तुमच्या कामात अधिक प्रोडक्टिव्ह होऊ शकता आणि विचलनांपासून मुक्त राहू शकता. तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा आणि तुमचे उद्दिष्ट साध्य करा. “Indistractable” या पुस्तकातील हे धडे आपल्या जीवनात नक्कीच बदल घडवू शकतात.

ही पोस्ट वाचा : चूक झाली मान्य करा, कारण यात फायदा तुमचा आहे

Leave a Comment