Study Tips for Students in Marathi: जून महिना आला की प्रत्येक आईवडिलांची नुसती धावपळ असते. शाळेमध्ये Admission घेणे आहे, दाखले तयार करायचे आहेत, वह्या-पुस्तकांची तयारी करायची आहे. पण ही धावपळ आईवडील का करत असतात? कारण मुलांनी नीट शिकावे आणि चांगले मार्क्स काढावेत. आजच्या पोस्टमध्ये आपण स्टडी टिप्स जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही पहिल्या दिवसापासून चांगली स्टडी करू शकता आणि परीक्षेत चांगले प्रदर्शन करू शकता.
जॉईन करा 👉 Threads App
1) पुस्तके मिळाली की त्यावर एकदा नजर मारा
शाळा सुरू व्हायच्या आधीच मुलांकडे शाळेची पुस्तके येतात. आता त्यांना फक्त कवर घालून बाजूला ठेवू नका. त्यामधील पहिला धडा वाचायला घ्या. तो धडा पूर्णपणे समजणार नाही, पण जेव्हा शाळेत शिक्षक तो धडा शिकवायला घेतील तेव्हा तुम्हाला तो समजायला खूप मदत होईल. कारण तुम्ही आधीच तो धडा वाचलेला असेल. यामुळे मुलांना शाळेतील शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यांना आत्मविश्वास वाटेल.
2) सोपे विषय आणि कठीण विषय याची ओळख
आपल्यासोबत असे होते की एखादा विषय प्रचंड आवडतो आणि एखादा अजिबात आवडत नाही. पण परीक्षेत दोन्ही विषय येणार असतात. तुम्ही आवडत्या विषयाची तयारी कराल यात काही शंका नाही, पण नावडत्या विषयाला जास्त वेळ कसा देता येईल हे बघा. सोपे विषय आपण कसेही करतो, पण कठीण विषयाला जास्त लक्ष द्यावे लागते. त्यामुळे त्याची ओळख करून ठेवा. नावडते विषय समजून घेण्यासाठी ट्यूटोरियल्स, एक्स्ट्रा क्लासेस आणि ऑनलाईन रिसोर्सेसचा वापर करू शकता.
3) कमी स्टडी पण जबरदस्त स्टडी
आजकाल पोरं खूप हुशार असतात, यात मला काही शंका नाही. पण ती सगळी हुशारी मोबाइलमध्ये गेली नाही पाहिजे. म्हणून दररोज थोडी स्टडी करा पण पूर्ण फोकसने करा. कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची स्टडी करायची आहे याचे एक टाइमटेबल बनवा. प्रत्येक सेशन दरम्यान ब्रेक्स घ्या, ज्यामुळे मन ताजेतवाने राहील आणि लक्ष अधिक काळ टिकून राहील. यासोबतच नियमित रिवीजन करा जेणेकरून शिकलेले विसरणार नाही.
ही पोस्ट वाचा 👉 सतत यूट्यूब बघता? शिकताय की फक्त वेळ वाया घालवताय?
4) मोबाइल वापरा पण काळजीपूर्वक
काय तुमच्यासोबत असे होते की पुस्तक वाचायला घेतले की मन लागत नाही? काही वाचले तरी ते लक्षात राहत नाही? याचे कारण आहे की आपला Attention Span खूप कमी झाला आहे. Attention Span म्हणजे तुम्ही किती वेळ एका गोष्टीवर डिस्ट्रॅक्ट न होता फोकस करू शकता. आता हे होण्याचे कारण आहे आपला मोबाइल. मोबाइल दर 30 सेकंदांनी नवीन काहीतरी बघायची आपल्याला सवय लागली आहे, त्यामुळे आपले मन स्टडीमध्ये लागत नाही. म्हणून, स्टडी करताना मोबाइल साइडला ठेवा किंवा स्टडी ऍप्सचा वापर करून शिक्षणाचा फायदा घ्या.
5) तुम्ही हुशार आहात हे समजून घ्या
सगळी पोरं हुशार असतात. पण एखाद्याला एक गोष्ट समजायला जास्त वेळ लागतो तर एखाद्याला कमी. प्रत्येक आईवडिलांनी आपले मूल कसे स्टडी करत आहे हे ओळखले पाहिजे. जर मुलगा सकाळी उठून चांगली स्टडी करतो तर त्याला सकाळी स्टडी करू द्या. जर एखादा मुलगा रात्री चांगली स्टडी करतो तर त्याला तसे करू द्या. उगाचच सकाळी उठ असा हट्ट नको. मुलांच्या लर्निंग स्टाइल्स ओळखून त्यांना तशीच संधी द्या. त्यांना स्वतःचा अभ्यास पद्धत शोधायला मदत करा.
निष्कर्ष
या स्टडी टिप्स वापरून तुम्ही तुमच्या मुलांना चांगले मार्गदर्शन करू शकता आणि त्यांना चांगले मार्क्स काढायला मदत करू शकता. मुलांच्या शिक्षणात सातत्य, प्रोत्साहन आणि समजूत याचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. त्यामुळे पालकांनी ही जबाबदारी नीट पार पाडावी. आणि मूल जर ही पोस्ट वाचत असतील कारण आजकाल मोबाइल लहान मुलांकडे पण असतो तर या टिप्स नीट समजून घ्या. तुमच्या स्टडी आणि लवकरच येणाऱ्या एक्झॅमसाठी ऑल द बेस्ट!
ही पोस्ट वाचा 👉 सामान्य लोकांपेक्षा स्मार्ट लोक कसे यशस्वी होतात? जाणून घ्या ६ स्मार्ट सवयी