Time Management Tips in Marathi: आपण नेहमीच ऐकतो की “Success takes Time”. याचा अर्थ असा की यश मिळण्यासाठी वेळ लागतो. पण सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण २०२४ मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती तास काम करता यापेक्षा तुम्ही कसे काम करता, किती फोकसने काम करता, तुमच्या कामाची गुणवत्ता काय आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. इथे टाइम मॅनेजमेंट (Time Management) हे खूप महत्त्वाचं आहे.
नवीन अपडेटसाठी फॉलो करा लिंक
एका आश्चर्यकारक तथ्यावर विचार करा
जर तुम्हाला असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी दिवसातून तुम्हाला १ तासापेक्षा जास्त वेळ तुमच्या ध्येयासाठी द्यावा लागेल तर तुम्ही ९९% लोकांमध्ये सामील होता जे कधीचं त्यांचे ध्येय प्राप्त करू शकत नाहीत.
पण फक्त १ तास याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मेहनत कमी घेणार किंवा हार्ड वर्क करणार नाही. ते सगळं तर येईल पण कोणतेही ध्येय गाठण्यासाठी लागणारा Mindset आणि दृष्टिकोण तुम्हाला बदलावा लागेल. इथेच टाइम मॅनेजमेंटचा (Time Management) विचार येतो.
मी बिझी आहे = एक भ्रामक कल्पना
अनेकजण मी बिझी आहे, वेळ नाही या चिंतेत असतात. त्यांना वाटतं खूप वेळ काम केलं म्हणजे खरं काम केलं किंवा Productive बनलो. पूर्ण दिवस काम करण्यात जातो पण त्या हिशोबाने रिझल्ट मात्र कधीचं मिळत नाही. तुम्ही सुद्धा असं करत असाल तर हा एक प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा. तुम्ही बिझी आहात पण नक्की कुठे?
1) नुसतं सोशल मीडिया
सोशल मीडिया फीड असेच डिझाईन केलेले असतात की तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्यावर घालवाल. Instagram एक रील बघायला घेतो, मग दोन होतात आणि बघता बघता 2 तास त्यातच जातात. याचा परिणाम असा होतो की एकतर वेळ वाया जातोच पण आपली पूर्ण एनर्जी आणि मोटिवेशन पण संपून जातं.
2) डोक्यात नको ते विचार
Overthinking करणे, जे होणार नाही त्याची कल्पना करत बसणे, एक विचार मग दूसरा असा करत करत तुम्ही त्या विचारांमध्ये अडकून राहता. त्यामुळे ना कोणत्याही कामावर तुमचा फोकस लागत, ना कसली प्रोग्रेस तुमच्या लाइफमध्ये होते.
3) सतत वेगवेगळे Apps वापरत बसणे
जेव्हा तुम्ही एखादं काम करताना सोशल मीडिया Apps वापरता तेव्हा तुमचा फोकस Loose होतो. जरा वेळ यूट्यूब वापरलं मग जरा वेळ Instagram, मग पुन्हा WhatsApp असं चालूच राहतं. असं केल्याने तुमचं एकही काम पूर्ण होत नाही.
ही पोस्ट वाचा माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज येतात, पण काय करावं सुचत नाही?
पण पण, तुमच्यासाठी एक चांगली बातमी
फोकस हे एक स्किल आहे जे तुम्ही विकसित करू शकता. कल्पना करा की आजपासून तुम्ही दिवसाचा फक्त 1 तास तुमच्या ध्येयासाठी देणार आहात. यासाठी योग्य टाइम मॅनेजमेंट (Time Management) आवश्यक आहे.
- टाइमर लावा
- फोन नाही, डिस्ट्रॅक्शन नाही
- फक्त 1 तास, 1 ध्येय (No Multitasking)
तुम्ही स्वत: शॉक व्हाल की फक्त 1 तास फोकस राहून तुम्ही किती लवकर तुमचं ध्येय प्राप्त करू शकता.
तुमच्या फोकस Muscle ला मजबूत कसं बनवाल?
कोणी जन्मजात फोकस घेऊन येत नाही. फोकस हे एक स्किल आहे जे तुम्ही सराव करून विकसित करू शकता. जस जिममध्ये जाऊन आपण बॉडीचे इतर भाग मजबूत बनवतो तसंच तुम्ही फोकस Muscle मजबूत करू शकता. फोकस Muscle वाढविण्यासाठी तुम्ही खालील टिप्सचा वापर करा.
1) छोटी सुरवात करा
जोशमध्ये येऊन मोठं काम करायला घेऊ नका. माहीत आहे सुरवातीला जोश जास्त असतो. पण तो काही वेळ टिकतो म्हणून आधी 25 मिनिटे काम करा. जशी सवय होईल मग तुम्ही त्यामध्ये 5-5 मिनिटे वाढवा.
2) Distractions कमी करा
मोबाइलचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी बंद करा. खास करून ते सोशल मीडिया Apps चे नोटिफिकेशन जस की YouTube, Instagram, आणि WhatsApp इ. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे फोनला तुमच्यापासून लांब ठेवा. एवढं लांब की उठून घेताना पण कंटाळा येईल.
3) कामाची प्लॅनिंग आधी करा
कोणतं काम पहिलं करायचं आहे ते आधी ठरवा. जे काम तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याला Focus Time मध्ये करण्याचा प्रयत्न करा.
निष्कर्ष | Conclusion
यशाचं अर्थ असं होत नाही की तासंतास काम करत राहणे. यश म्हणजे कमी काम करणे पण योग्य काम करणे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. टाइम मॅनेजमेंट (Time Management) आणि फोकस्ड वर्क करूनच तुम्ही तुमच्यामधील क्षमता जागी करू शकता, जिचा वापर करून तुम्ही लाइफमध्ये मोठ्या गोष्टी मिळवू शकता. म्हणून फोकस वाढवा. टाइम नाही. आपल्याकडे फक्त 24 तास असतात. पण कोण किती फोकस आहे यावरून तो किती यशस्वी आहे हे ठरवलं जात.
ही पोस्ट वाचा लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल