Gautam Buddha Quotes: आज गौतम बुद्धांची २५८५ वी जयंती आहे, हा दिवस जगभरात बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. सिद्धार्थ गौतम, शाक्यमुनी किंवा फक्त बुद्ध म्हणून ओळखले जाणारे, त्यांच्या गहन शिकवणींनी बौद्ध धर्माचा पाया घातला. संस्कृतमध्ये ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ ‘जागृत’ किंवा ‘ज्ञानी’ असा होतो. या शुभ प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गौतम बुद्धांचे Top 10 Gautam Buddha Quotes (तेही मराठी स्पष्टीकरणांसह) जे आपल्याला अधिक अर्थपूर्ण, निरोगी आणि दयाळू जीवनासाठी मार्गदर्शन करतात.
नवीन अपडेटसाठी फॉलो करा लिंक
1. आयुष्यातील तुमचा उद्देश हाच आहे की तुमचा आयुष्यातील उद्देश शोधणे आणि तुमचे संपूर्ण हृदय आणि आत्मा त्यास अर्पण करणे आहे.
स्पष्टीकरण: तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायच आहे हे स्पष्ट असले पाहिजे. आणि एकदा का ते स्पष्ट झाल की तुमचा पूर्ण फोकस ते उद्देश पूर्ण करण्यासाठी लावायचा आहे.
2. शरीर सुदृढ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, अन्यथा आपण आपले मन मजबूत आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही.
स्पष्टीकरण: कारण शरीर जेव्हा सुदृढ असेल तेव्हाच तुम्ही चांगले विचार करू शकता. आणि जेव्हा विचार चांगले आणि स्पष्ट असतील तुम्ही आयुष्यात हव ते मिळवू शकता.
3. खरे प्रेम हे समजूतदारपणापासून जन्माला येते.
स्पष्टीकरण: खर प्रेम नक्की काय असत? भांडण न करणे, सतत प्रिय व्यक्तीला गिफ्ट देणे की अजून काही. पण हे सगळ नंतर येत. कारण कोणतेही नात असुदेत त्याचा पाया हा समजूतदारपणावर रचला जातो. म्हणून जिथे समजूतदारपणा तिथे खर प्रेम.
4. तुम्ही कितीही पवित्र शब्द वाचा, कितीही पवित्र बोला, जर तुम्ही त्यावर कृती केली नाही तर त्याचा काय फायदा होणार?
स्पष्टीकरण: तुम्ही भागवत गीता वाचली असेल, तुम्ही राम चरित्र वाचल असेल, तुम्ही छत्रपतींचा संपूर्ण इतिहास वाचला असेल किंवा तुम्ही दर दिवशी देवाची पूजा अर्चना करत असाल पण या सगळ्याचा काही फायदा होणार नाही जर त्यातील विचारांची अंमलबजावणी तुम्ही तुमच्या आयुष्यात करणार नाही.
5. एका मेणबत्तीतून हजारो मेणबत्त्या पेटवल्या जाऊ शकतात आणि मेणबत्तीचे आयुष्य कमी होणार नाही. आनंद वाटून घेतल्याने कधीच कमी होत नाही.
स्पष्टीकरण:तुमच्या आयुष्यात तुम्हाला मेणबत्तीसारख व्हायच आहे. आनंद वाटल्याने तो अधिक वाढतो, कमी होत नाही. म्हणून छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधा आणि इतरांसोबत शेअर करा.
6. तुमच्या मनावर राज्य करा नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल.
स्पष्टीकरण: आपल मन हे जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनत जाता. मनामध्ये चांगले विचार असतील तर तुम्ही चांगलेच बनणार. पण मनात वाईट विचार असतील तर सगळ जग तुम्हाला वाईट वाटेल. म्हणून तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल असला पाहिजेत नाहीतर तो तुम्हाला कंट्रोल करेल.
7. दुःखाचे मूळ कारण अटॅचमेंट आहे.
स्पष्टीकरण: तुमची आवडती व्यक्ती, तुमचा फोन, गाडी आणि अशा बऱ्याच गोष्टी. जर तुम्हाला यासोबत खूप अटॅचमेंट असेल तर जेव्हा या तुमच्यापासून दूर जाणार तुम्हाला भयंकर त्रास होणार. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त अटॅचमेंट कोणासोबत करू नका.
8. रोज सकाळी, आपला पुनर्जन्म होतो. आज आपण काय करतो हे सर्वात महत्त्वाचे आहे.
स्पष्टीकरण: प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते तुम्हाला हव ते मिळवण्याची, तुमचे ध्येय पूर्ण करण्याची. रोज सकाळी उठणे हा जणू एक पुनर्जन्म असतो. त्यामुळे काल काय झाल याचा विचार करत बसू नका. आज तुम्ही काय करू शकता याचा विचार करा.
9. आपल्या विचारांनी आपण जग घडवतो.
स्पष्टीकरण: तुम्ही जसा विचार कराल तस करण्याची पूर्ण क्षमता तुमच्यामध्ये आहे. कारण कोणतेही काम असो सगळ्यात आधी त्याची सुरुवात आपल्या माइंडमध्ये एक विचार म्हणून होते. आणि जर तुम्ही त्या विचारावर काम केलत तर ते सत्यात उतरायला वेळ लागत नाही.
10. समस्या अशी आहे की तुम्हाला वाटते की तुमच्याकडे वेळ आहे.
स्पष्टीकरण: जर नीट विचार केलात तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूकडे चाललोय. एक एक दिवस जात आहे आणि आपण म्हातारे होत आहोत. पण तरी सुद्धा आपण बेफिकीर सारख वागतो. ध्येय असो की स्वप्ने, ती पूर्ण करण्यासाठी टाळाटाळ करतो. अस करून नका आजच कामाला लागा कारण वेळ कमी आहे.
आशा आहे की या पोस्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळाल असेल. जर तुमच उत्तर हो असेल तर ही पोस्ट तुमच्या एका जिगरी मित्रासोबत शेअर करा. अशाच अजून पोस्टसाठी या ब्लॉगला भेट देत रहा. दररोज 1% बेटर बनणे आणि बनविणे हे आमच ध्येय आहे.
ही पोस्ट वाचा लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल
4 thoughts on “Top 10 Gautam Buddha Quotes: अर्थपूर्ण आणि निरोगी जीवनासाठी गौतम बुद्धांचे टॉप १० Quotes (तेही मराठी स्पष्टीकरणांसह)”