World Environment Day Wishes in Marathi: आजकाल परिस्थिती अशी आहे ना की घरातून अंघोळ करुन बाहेर पडलो की दुसरी अंघोळ काही मिनिटात होते तेही घामाने. हो की नाही? काही राज्यात तर तापमान ५० डिग्रीच्यावर पोचले आहे. आता हे सगळं का होतंय? याचं कारण काय? आज ५ जून २०२४, आज पर्यावरण दिनानिमित्त आपण हेच जाणून घेणार आहोत.
जॉईन करा 👉 Threads App
पर्यावरणाच्या नाशाचे कारण
पर्यावरणाचा होणारा नाश हीच याची मुख्य कारणे आहेत. आपण शाळेत असताना शिकलो होतो की झाडे लावा, झाडे जगवा. मला अजून पण आठवतं आहे की पर्यावरण दिन असला की आमच्या शाळेतून गावात एक दिंडी निघायची.
आम्ही जोर जोरात घोषणा द्यायचो की झाडे लावा, झाडे जगवा, आपल्या पृथ्वीला वाचवा आणि अशा बऱ्याच घोषणा. पण त्यावेळी जेवढी आवड होती ती जसजशी मोठे होत गेलो तशी कमी होत गेली.
पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी
आता शाळा कॉलेज होवून किती वर्षं झाली. आता पुन्हा त्या घोषणा नाहीत. की झाडे लावायची जागरूकता नाही. फक्त लहानपणी घोषणा दिल्या म्हणजे आपलं काम झालं असं होत नाही. तर आता आपण काय केले पाहिजे?
झाडे लावा
तुम्ही तापमान बघत आहात किती वाढलं आहे. यावर ताबा मिळवायचा असेल तर आपल्या प्रत्येकाला आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरी भागात झाडे लावणे शक्य नसल्यास गावी झाडे लावा. झाडे हवी तेवढी ऑक्सिजन देतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करतात. झाडे लावण्याने वायुप्रदूषण कमी होते आणि तापमान कमी करण्यास मदत होते.
प्लास्टिकचा वापर कमी करा
शक्य तेवढे प्लास्टिकचा वापर कमी करा. प्लास्टिक अपायकारक असतो कारण तो नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्याचे पुनर्वापरासाठी पर्याय वापरा जसे की कापडी पिशव्या, काच आणि धातूचे पॅकेजिंग.
पुनर्वापर आणि पुनरुत्पादन
जेव्हा शक्य असेल तेव्हा वस्तूंचा पुनर्वापर करा आणि त्यांचे पुनरुत्पादन करा. उदाहरणार्थ, जुन्या कपड्यांचा उपयोग नवीन वस्त्रे बनवण्यासाठी किंवा घरगुती वस्तू बनवण्यासाठी करा.
ऊर्जा वाचवा
वीज, पाणी आणि इंधन यांचा विचारपूर्वक वापर करा. अनावश्यक वीज वाया जाऊ नये म्हणून दिवे बंद करा, पाण्याचा वापर कमी करा आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
World Environment Day Wishes in Marathi
पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या, तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या.
पर्यावरण दिनाचा दिवस खास, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ श्वास
जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
ही पोस्ट वाचा 👉 आनंददायक आणि यशस्वी जीवनासाठी ५ महत्वपूर्ण प्रश्न